लय भारी राव
एकाएकी आता लिहावेसे वाटले आणि हा चाळा सुरु करत आहे. कदाचित आपल्या हृदयाच्या (किंवा गांडीच्या) कोपर्यात देखील एक लेखकाचा आत्मा वळवळत असेल, आणि आपण मनुष्य म्हणून त्याला वाट करून दिली पाहिजे असे वाटले आणि हे सुरु केले आहे. तुकारामांसारख्या थोर संतांनी याविषयी आधीच भाष्य केले आहे आणि म्हणून त्याविषयी जास्त बोलायची गरज भासत नाहीये.
जीवनामध्ये लय सापडणे अत्यंत महत्वाचे असावे कदाचित. जर आपण अगदी पादण्यासारखी एक शुल्लक गोष्ट बहुतेकदा लयबद्ध पद्धतीने करतो, किंवा ऐकतो तर मग जीवन तर किती मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे, नाही का?
लय मग ती शिक्षणाची असो, नोकरीची असो, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रवासाची असो किंवा आणखी काही, ती असावी लागते, नाहीतर काहीतरी अपूर्ण असल्याची जाणीव राहते. सेक्स, वाचन, चिंतन, अशा इंटलेक्चुअल गोष्टींमध्ये देखील तिचे महत्व भासते. संगीत क्षेत्रामध्येच आपण आज लय असते अशी गोष्ट बहुतेकदा टीव्ही वर चालणाऱ्या कार्यक्रमांमध्ये ऐकत असतो. संगीतामधे लय हि एक स्वाभाविक गोष्ट आहे, पण तसे असतांना ती इतर कामांमध्ये देखील लागते.
आणि इतर अनेक स्वाभाविक गोष्टींपेक्षा लय हि वेगळी ठरते कारण ती 'साधावी' लागते. लय साधणे हि एखाद्या प्रक्रियेचा शेवटचा टप्पा असू शकतो. तसे असले तरी ते महत्वाचे आहेच.
मुळात काहीतरी करून आपण लेखनाची सुरुवात करावी या पलीकडे ह्या पोस्ट चा अजून कुठलाही उद्देश नाहीये. त्यातदेखील मला कितपत ती लय साधता आली आहे, कोणास ठाऊक. कदाचित नियमितपणा ठेवला तर मी हे करू शकेन.
आभारी

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.