दे रे दादा, दे गं माय,
असे स्वर कानावर आले.
काय द्यावे, सुट्टे तर रिक्षाला लागतील,
मग काय द्यावे?
करकरीत नोटा तर आत्ताच ए.टी.एम मधून काढल्यात
पगार आत्ताच झालं नं,
मग काय द्यावे?
ऑफिस वरून परत आल्यामुळे आता डबापण संपलाय,
मग काय द्यावे?
कपडे देणं तर शक्यच नाही, आणि कदाचित तो भिकारी घेणार पण नाय,
मग काय द्यावे?
शिक्षण-बिक्षण देणे तर दूरच- नको तो आदर्शवाद आणि नको तो सुधारवाद (असला काही शब्द असेल असे वाटत नाही, इतके “वाद” झाले आहेत कि आता शब्द बाद झालेत!)
मग काय द्यावे?
बॉस प्लीज, फेसबुक वर एखादा स्टेटस अपडेट तर देऊच शकतो आपण!
आपल्या हक्काची भिंत, आपण इथे कधीही मुतू शकतो!
-